त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली. ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही.. केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्याकडे आला , कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..? "मला चमत्कार पाहिजे" केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ? ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे.. ...